Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन..

   गडचिरोली/अहेरी,२५-०१-२०२४::- नगरपंचायत क्षेत्रातील माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते लाखो विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आली आहे.त्यावेळी येथील नागरिकांचा चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.वार्डातील समस्त नागरिक अजयभाऊंची आभार मानले.

   काल अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी नगरपंचायत येथील वॉर्ड नंबर 10 येथील नाली कवर बांधकाम – वॉर्ड नंबर 13 येथील नाली बांधकाम -वॉर्ड नंबर 14 येथील सी.सी.रोड बांधकाम – 16 येथील नाली बांधकाम – 17 येथील सी.सी.रोड बांधकामांचे भूमिपूजन आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

   यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,बालकल्याण सभापती मिना ओंडरे,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकीवार,नगरसेवक विलास गालबाले,नगरसेविका नौरस शेख,नगरसेविका ज्योती सडमेक,नगरसेविका सुरेखा गोडसेलवार,मारपल्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह क्षेत्राती आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच वार्डातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular