VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी,२७-०१-२०२४::-गणपुर( रै) गावच्या वैनगंगा नदीत मंगळवार २३ जानेवारीला ११:०० वाजताच्या सुमारास जी दुर्दैवी घटना घडली त्या मुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वैनगंगेच्या पैल तीरावरील नदी पात्रातून नावेने नेहमी प्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील टोक या गावात मिरची तोडण्यासाठी जात असलेल्या ६ महिलांचा प्रवास अखेरचाच ठरला. चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै) येथील मजूर महिलांना घेऊन जाणारी नाव उलटली आणि सहा जणी बुडाल्या होत्या त्यापैकी सर्व ६ महिलांचे मृतदेह सापडले असून नावाड्यासह एक महिला वाचली होती.
या पैकी तिघांच्या मृतक कुटुंबांना शासनाकडून नैसर्गिक आपत्ती निधीतून दिंनाक २४ जानेवारीला प्रत्येकी ४ लाख रुपये तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले होते.
मात्र उर्वरित तीन मृतक महिलांचे मृत्यूदेह दिनांक २५ जानेवारीला एक तर २६ जानेवारीला दोन मृत्यूदेह मिळाले असून त्यात १) सुष्मा सचिन राऊत,२) मायाबाई अशोक राऊत,३)बुधाबाई देवाजी राऊत असे असून यांना सुद्धा शासनाकडून नैसर्गिक आपत्ती विभाग निधीतून यांच्या वारसदारांना १)सचिन अशोक राऊत (पती), २)अशोक सुखराम राऊत (पती), ३) बालाजी देवाजी राऊत (मुलगा) असे असून धनादेश वाटप चामोशिऀचे नायब तहसीलदार कावडे सर यांच्या हस्ते करण्यात आले असून या वेळी गणपुर (रै) चे सरपंच सुधाकर गद्दे, उपसरपंच जीवन भोयर, माजी पंच्यायत समिती सदस्य माधव परसोडे, मंडळ अधिकारी नवनाथ अतकरे,कोतवाल मंगेश पेंदौर आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
