VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या व उपक्रमात विजेत्यांचा केला सत्कार.
गडचिरोली,२७-०१-२०२४::-गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडलेल्या ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पूर्णवेळ उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात उत्तम सेवा देणाऱ्या तसेच आपल्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या विविध कार्यालयीन अधिकाऱ्यांचा तसेच विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा व स्पर्धंत विजेत्यांचा सत्कार यावेळी मा. आमदार डॉक्टर देवरावजी होळी, मा. जिल्हाधिकारी संजयजी मीना, जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.
