Saturday, May 23, 2026
HomeEtapalliसुरजागड माईन्स येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात,, ९० वर्षीय नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण...

सुरजागड माईन्स येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात,, ९० वर्षीय नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

लॉयड मेटल अॅन्ड एनर्जी लि. कंपनीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.

गडचिरोली/सुरजागड,२७-०१-२०२४::- लॉयड मेटल अॅन्ड एनर्जी लि. कंपनीच्या वतीने सुरजागड आयरनस अॅन्ड माईन्स च्या प्रांगणात भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात पार पडला. एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील ९० वर्षीय पांडू कोत्तू तेलामी या वृध्द नागरिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी वयोवृध्द नागरिक पांडू कोत्तू तेलामी यांचा कंपनीच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

    प्रजासत्ताक दिन सोहळयानिमित्य लॉयड मेटल कंपनीच्या वतीने अधिकारी व कर्मचार्यांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular