Monday, September 21, 2026
HomeEtapalliक्रिडा व कला संमेलनातून विद्यार्थ्यांनी नाव लौकीक करावे,, माजी जि.प.सदस्य सैनुजी गोटा...

क्रिडा व कला संमेलनातून विद्यार्थ्यांनी नाव लौकीक करावे,, माजी जि.प.सदस्य सैनुजी गोटा यांचे प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/एटापल्ली,आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण दडलेले असतात मात्र व्यासपीठ अभावी त्यांच्यातील सुप्त गुणांचा पाहिजे त्या प्रमाणात विकास होत नाही शालेय स्तरावर क्रीडा व कला संमेलन घेतले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होत असते विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त गुणांचा विकास करून नाव लोकिक करावे असे प्रतिपादन माजी जि प सदस्य सैनुजी गोटा यांनी केले पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या केंद्र गट्टा च्या वतीने क्रेंदस्तरीय बाल क्रिडा व कला संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुभाषचंद्र बोस विद्यालय गट्टा येथे पार पडला त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते संमेलन अध्यक्षस्थानी सरपंच पूनम लेखामी ह्या होत्या प्रमुख अतिथी म्हणून माजी पं स सदस्या शिलाताई सैनु गोटा, पोलीस पाटील कन्नाजी गोटा, वैद्यकीय अधिकारी डॉ वड्डे, ग्रामसेवक मनोज मेश्राम, माजी सरपंच दोडगे गोटा, वनहक्क समितीचे अध्यक्ष तानेंद्र लेखामी , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद शहा, उपाध्यक्ष दिलीप दहागावकर , भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सहप्रमुख सूरज जक्कुलवार , विशाल पुजलवार , केंद्रप्रमुख एम सी बेडके, गाव भुमिया कोलू गोटा, ग्रा प सदस्य मिरावा लेखामि, ग्रा प सदस्य संजय गोटा, आरोग्य सेवक नामदेव वासेकर, सचिन मोतकुरवार, कैलाश गोरडवार आदी मान्यवर उपस्थित होते क्रीडा ही शारीरिक क्रिया आहे विद्यार्थ्यांनी खेळात स्वतःला हार मानून घेऊ नये , हरणे चुकीचे नसून प्रयत्न न करता हार मानने चुकीचे आहे असे मार्गदर्शन डॉ वड्डे यांनी विद्यार्थ्यांना केले

क्रीडा संमेलनात कबड्डी, खोखो, मॅरॅथॉन स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख एम सी बेडके यांनी केले, संचालन व आभार वाळवी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत काटेलवार यांनी केले संमेलनाचे व्यवस्थापन गट्टा शाळेचे मुख्याध्यापक एल एम मारटकर यांनी केले क्रीडा व कला संमेलन यशस्वी करण्यासाठी डी पी ओंढरे, वसंत मडावी, संजय घुबडे, एच जे वेलादी, डी पी हलामी, वामन नवलू, पी एस कुडे, पतनीत सातपुते केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular