Saturday, May 23, 2026
HomeAramoriधानाचा डबल उत्पन्न घेण्या करिता चिकलटी करत असताना ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच...

धानाचा डबल उत्पन्न घेण्या करिता चिकलटी करत असताना ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/आरमोरी०३-०२-२०२४::- शेतीकाम करण्यास जात असलेला ट्रॅक्टर शेतात चिखलात फसल्याने, फसलेला ट्रॅक्टर काढण्याच्या नादात ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव शेतशिवारात घडली. सूरेश दुधराम लट्ठे (५०) रा. ठाणेगाव असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

माहितीनुसार, मृतक सुरेश लट्ठे हा दुपारच्या सुमारास ठाणेगाव शेतशिवारातील शेतीकाम करण्यासाठी जात होता. दरम्यान ऋषिजी नैताम रा. ठानेगाव यांच्या शेतात अचानक शेतातील खोल चिखलात ट्रॅक्टर फसला. त्यावेळी मागील चाकात लाकडी खांब टाकून फसलेला ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर अचानक उलटले. यात ट्रॅक्टरखाली चिखलात दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती गावात होताच नागरिकांनी घटनास्थळी जात पोलिसांना घटनेची माहिती दिली. या माहितीवरून आरमोरी पोलीस घटनास्थळी दाखल होत इंजिनखाली दबलेला मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला. घटनेचा अधिक तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular