Saturday, May 23, 2026
HomeChamorshiमार्कंडेश्वर मंदीराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होऊ दे...

मार्कंडेश्वर मंदीराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होऊ दे…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत मार्कंडेश्वराला साकडे.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीवरून देवेन्द्रजी फडणविस मार्कंडा देवस्थानात.

मार्कंडेश्वराचे केले विधिवत पूजन.

मार्कंडेश्वर देवस्थान बांधकामाचा घेतला आढावा

आमदार महोदयांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार,

गडचिरोली/देवमार्कंडा,०५-०२-२०२४::-  एमएसआरडीसी ला १०० कोटी , पुरातत्व विभागाला ५ कोटी रुपये मंजूर करूनही अजून पर्यंत बांधकाम सुरू न झाल्याने मार्कंडेश्वर मंदिराच्या बांधकामाला गती मिळावी यासाठी आपण स्वतः मार्कंडा देवस्थानात येऊन त्या संदर्भातील कामांचा आढावा घ्यावा अशा आशियाची विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली असता त्यांनी विनंती मान्य करून आज मार्कंडा देवस्थानाला भेट दिली मार्कंडेेश्वराचे दर्शन घेत विधिवत पूजा केली व मार्कंडेेश्वराच्या बांधकामा बाबतचा आढावा घेतला. याप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मार्कंडेश्वराचे पूजन करून मार्कंडेश्वर मंदीराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होऊ दे असे मार्कंडेश्वराला साकडे घातले.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्कंडा आगमनासाठी विशेष आभार मानले. व आपण आल्याने या मंदिराच्या बांधकामाला नक्की गती मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular