Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliग्रंथालयांनी आपला ग्रंथालय डिजिटल करण्यासाठी पुढाकार घ्यावा - आमदार डॉ देवरावजी होळी...

ग्रंथालयांनी आपला ग्रंथालय डिजिटल करण्यासाठी पुढाकार घ्यावा – आमदार डॉ देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ व शिवाजी सार्वजनिक वाचनालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत १० व्या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित पदाधिकऱ्यांना मार्गदर्शन

गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात  कार्यक्रमाचे आयोजन.

ग्रंथालयांना सर्वोतोपरी मदत करणार.

गडचिरोली,०५-०२-२०२४::-आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पुस्तकांवर भर न देता जिल्ह्यातील ग्रंथालयांनी आपला  ग्रंथालय डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ व शिवाजी सार्वजनिक वाचनालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत १० व्या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित पदाधिकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी त्यांनी ग्रंथालयांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

गडचिरोली  शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात   आयोजीत कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजाननजी कोटेवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष पांडुरंग जी म्हशाखेत्री, सचिव जगदीशजी  म्हस्के,  कोषाध्यक्ष दिलीपराव म्हस्के, अरुणजी मुंघाटे, सदस्य कौश्यल्या पाल, श्रीमती राजश्री मुंघाटे,  सचिन म्हशाखेत्री, सहसचिव रविंद्रजी समर्थ यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular