Thursday, July 30, 2026
HomeAheriआलापल्ली येथे रात्रकालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम...

आलापल्ली येथे रात्रकालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण…

VÀINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

   आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन कडून आलापल्ली येथे रात्रकालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन.

 गडचिरोली/अहेरी,०६-०२-२०२४::-तालुक्यातील आलापल्ली येथे आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन कडून आयोजित रात्रकालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

     या बक्षीस वितरण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम,पृथ्वीराज आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठित व्यक्ती ईश्वरजी वेलादी,आलापल्ली ग्राम पंचायत चे माजी सरपंच विजय कुसनाके,आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष उमेश आत्राम,लक्ष्मण जंगमवार,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे,सुनील जंगमवार,स्वामी जंगमवार,आदर्श केसनवार,सुधाकर कोरेत,लकी आत्राम सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.          

     आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन कडून आयोजित रात्रकालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रतीक गेडाम यांनी मानले.या रात्रकालीन टेनिस बॉल सामन्याचे बक्षीस वितरण सोहळ्याला आलापल्ली येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी क्रीडा अध्यक्ष रुपेश आत्राम,प्रतीक गेडाम, तिरुपती वेलादी,आशुतोष येनगंदलवार,लक्ष्मण येनगंदलवार,सूरज मडावी,रोहन येदासलवार,राहुल सिडाम,नोमेश आलाम, रोहित सडमेक,समीर बावणे सह आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन च्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular