Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मृतकाच्या कुटुंबास केली आर्थिक मदत...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मृतकाच्या कुटुंबास केली आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी  

गडचिरोली/अहेरी,०७-०२-२०२४::-तालुक्यातील रामयापेठा येथील रहिवासी दुलसा मासा मडावी याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.

मृतकाच्या मागे मोठा परिवार असल्याने घरचा करता पुरुषाचा मृत्यू झाल्याने त्या कुटुंबाला आर्थिक संकट आपले होते.मृतकाची पत्नी जिज्या दुलसा मडावी हिला समोर खर्चासाठी अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत करण्यात आले.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार म्हणले की”समोर आणखी अडचण भासल्यास मला कळवा असा धीर त्यांनी कुटुंबियांना दिले.त्यावेळी मडावी परिवारातील सदस्यांनी अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी उपस्थित संतोष रामय्या वसाके,दलसू देवू मडावी,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्लीसह मडावी परिवारातील सदस्य तसेच आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular