Monday, September 14, 2026
HomeSironchaमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/सिरोंचा,१४-०२-२०२४::- तालुक्यातील कोठामाल येथील ब्लॉक पाॅथर्स क्रिकेट क्लब कोठामाल तर्फे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट ग्रामीण भागीय स्पर्धेचे आयोजित केली आहे.सदर या क्रिकेट स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.    या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.कार्यक्रमाचे सहउदघाटन म्हणून आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम – काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जावजी – महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नीताताई तलांडे होते.   यावेळी उदघाटन प्रसंगी व्येकटापूर ग्रामपंचायतचे सरपंच अजय पोरतेट,उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक भाऊ तोगम,ग्रा.प.सदस्य ममिता कोरेत,चदृ मुळमेथे सदस्य ग्रा.प.सदस्य,तेराजना कुमराम माजी सरपंच,शामराव कुळमेते पोलीस पाटील,संजय पुरतेट माजी उपसरपंच राजाराम,लकमा सडमेक,तिरुपती दुर्गे,अंकुलू पानेम, सागर कुळमेते,सतीश पानेम,धनंजय भाऊ,मनोहर पागडे पोलीस पाटील ,सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular