Saturday, May 23, 2026
HomeNagapur१७-१८ फेब्रुवारी- २०२४ रोजी नागपुर येथे स्वतंत्र मजदुर युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन...

१७-१८ फेब्रुवारी- २०२४ रोजी नागपुर येथे स्वतंत्र मजदुर युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

नागपूर,१७-०२-२०२४::-स्वतंत्र मजदूर यूनियन या देशव्यापी कामगार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन १७-१८ फेब्रुवारी २०२४ रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबार, नागपुर येथे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस.पाटील यांचे अध्यक्षतेखाली होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध विचारवंत कांचा इलैया, हैद्राबाद यांचे हस्ते होणार आहे. प्रसंगी मान्यवर विविध विषयांवर विचार व्यक्त करतील.

अधिवेशनामध्ये देशातील कामगारांचे प्रश्न किमान वेतन, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकाचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना, कामगारांचे संवैधानीक हक्क व अधिकार, पदोन्नतीमधील आरक्षण, आदी विषयांवर सखोल चर्चा करून ठराव मांडन्यात येतील असे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र जारोंडे यांनी सांगितले. १८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. के.पी. स्वामिनाथन यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी स्वतंत्र मजदुर युनियन ला केन्द्र सरकार तर्फे सर्व पातळ्या सह इंटर नॅशनल लेबर ऑर्गनाझेशन वर प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आराखडा प्रस्तुत करतील. प्रसंगी मंजूर झालेले ठराव केन्द्र शासनाकडे सादर केले जातील. या राष्ट्रीय अधिवेशनात, तमिलनाडु, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, उ.प्र., राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली ,बिहार, पश्चिम बंगाल यांसह महाराष्ट्रातील विविध संलग्न संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित राहणार असल्याची माहिती म.रा.मा.वी. क. संघटन गडचिरोली सर्कल अध्यक्ष श्री सुधीर चौधरी, सचिव श्री. जे.पी. मेश्राम, विभागीय अध्यक्ष श्री.योगेश सलामे उपाध्यक्ष श्री सचिन ढोके, सचिव श्री विजय सहारे व ई. पदाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली व सर्व असंगठीत कामगारांना सदर अधिवेशनास जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहण्याचे जाहिर आवाहन केलेले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular