VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी,१९-०२-२०२४::-वेगवेगळया प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्राची आणि राज्याची सरकार आदिवासी समाजाची जमीन आणि त्यांचा निवारा हिसकावण्याच्या काम करीत आहे. परंतू जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत यांच्या प्रयत्न सफल हाऊ देणार नाही. असे आव्हान एड विश्वजित मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांनी केले. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावात वाचनालय झाला पाहिजे हाच माझा संकल्प जेणेकरून प्रत्येक गावातील आदिवासी युवक हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि स्वतःच्या अधिकारापासून दूर राहणार नाही हाच खरा उद्देश विश्वजित मारोतराव कोवासे यांचे प्रतिपादन.
दिनांक 18 फेबूरवारी 2024 रोजी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके गोटुल समिती पुसगुडा मक्केपल्ली चक नंबर 3 ता. चामोर्शी जि.गडचिरोली येथे सल्ला गागरा शक्ती अनावरण व कोया पूनेम गोंडी धर्म संमेलनाचे अयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित डॉ.नामदेवजी उसेंडी माजी आमदार, रामदास पुंगाटी अध्यक्ष पारंपारिक ग्रामसभा इलाका घोट, जे. बी. गेडाम सल्लागार ऑल इंडिया फेडरेशन चामोर्शी, प्रभाकर येरमे, प्रशांत पोयाम अध्यक्ष, सुधाकर गेडाम सरचिटणीस, दिपक आत्राम कोशाध्यक्ष, उमेश कुमरे वालसरा, नितेश भाऊ राठोड युवक काँग्रेस उपाध्यक्ष गडचिरोली , जैलाबाई कुलेटी ग्राम पंचायत सदस्य, अरुण बावणे, श्यामराव पेंदोर वाघदरा, मायाबाई मडावी गडचिरोली, अनुप हलदर, नरेश शेट्टे, कोडापे मॅडम, गौराबाई गावडे सरपंच विसापुर, जैलाबाई कुलेटी, सिताराम मंनो, फकरी नरोटे, तिम्मा सर, आणि मोठ्या संख्येने गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते.
