VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन.
चामोर्शी पंचायत समितीची २२ फेब्रुवारी रोजी वार्षिक आमसभा.
गडचिरोली/चामोर्शी,२१-०२-२०२४::-आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी चामोर्शी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले असून या आमसभेला तालुक्यातील नागरिकांनी आपल्या लेखी समस्यांसह उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या माध्यमातून केले आहे.
ही आमसभा चामोर्शी पंचायत समितीच्या आवारात सकाळी ११वाजता सुरू करण्यात येईल जनतेने आपल्या समस्या या आमसभेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे व आपल्या समस्यांचे एक लेखी निवेदन या आमसभेच्या प्रसंगी आणावे असे आवाहन त्यांनी या माध्यमातून केले आहे.
