Saturday, May 23, 2026
HomeBrahmapuriखासदार अशोक नेते यांची ब्रह्मपुरी येथे पेशंटच्या संबंधित सर्वोदय दवाखान्याला भेट...

खासदार अशोक नेते यांची ब्रह्मपुरी येथे पेशंटच्या संबंधित सर्वोदय दवाखान्याला भेट…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

चंद्रपूर/ ब्रह्मपुरी,२५ फेब्रुवारी २०२४ ::- खासदार अशोक नेते यांनी धानोरा येथील तालुका अध्यक्ष लता ताई पुन्घाटे यांच्या मुलाची तब्येत अचानकपणे बिघडल्याने त्यांना ब्रह्मपुरी येथील सर्वोदय दवाखान्यात भरती करण्यात आले.या संबंधित माहिती मिळाल्याने खासदार अशोक नेते यांनी आज दिंनाक २५ फेब्रुवारी २०२४ ला ब्रह्मपुरी येथील सर्वोदय दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना भेट घेऊन त्यांच्या तब्येत ची तपासणी करून योग्य उपचाराबाबत सूचना केल्या.

तसेच मौजा-डोंगरगाव ता.आरमोरी येथे सचिन कुथे यांचा छोटासा मूलगा शिवजयंती साजरी करत असताना फटाका स्फोट होऊन डोक्याला गंभीर इजा होऊन जखमी झाला याच दवाखान्यात तो ही भरती आहे अशी माहिती जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी खा.नेते यांना दिली यावेळी सुद्धा त्यांची भेट घेत उपचाराबाबत डॉक्टर यांना सुचना करून काळजी घ्यावी. असे खा.नेते यांनी भेटी दरम्यान सांगीतले.

याप्रसंगी सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द चे व्यावसायिक तथा ओबीसींचे नेते कविंद्र रोहणकर यांच्या सासूबाई ह्या हि दवाखान्यात भरती असल्याने त्यांचीही भेट खा.नेते यांनी घेतली.

 यावेळी खासदार अशोक नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी,माजी जि.प.अध्यक्ष समय्या पसूला,तालुकाध्यक्ष लताताई पुन्घाटे, डॉक्टर काकाणी उपस्थितीत होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular