VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,२९ फेब्रुवारी २०२४::- महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 च्या 28 संघटनाचा वतीने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती /पारेषन /महावितरण कंपनीतील कंत्राटी यंत्रचालक, तंत्रन, कणीस्ट सहाय्यक लेखा /मास. या कामगारांच्या विविध 13 मागण्या क्रमबद्ध आंदोलनाची नोटीस मा. मुख्यमंत्री साहेब. मा. ऊर्जामंत्री साहेब व तीनही कम्पण्याचे अध्यक्ष यांना दिनांक 7/2/2024 रोजी देण्यात आले होते परंतु कुठलाही तोडगा न निघाल्यामुडे टप्पा क्रमांक 5नुसार 28,29फेब्रुवारी 2024 रोजी कंत्राटी कामगारांचा काम बंद धरणे आंदोलन सुरु आहे. दिनांक 28/2/2024 ला महावितरण प्रविभाग गडचिरोली कार्यल्यासमोर भव्य द्वार सभेचे आयोजन करण्यात आले. सदर द्वारसभेला 250 कंत्राटी कामगार होते. सदर द्वारसमध्ये कामगारांनी घोषणाबाजी देऊन प्रशासनाचा निषेध नोंदीवण्यात आला.
प्रलंबित मागण्या खालील प्रमाणे,
१) तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी, बाह्य स्त्रोत कामगार, सुरक्षा रक्षक, कनिष्ठ सहाय्यक,(लेखा/मांप) व प्रकल्पग्रस्त कामगारांना तेलंगाणा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, ओडीसा, इत्यादी वीज कंपन्यातील कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार सामावून घेतले त्याच प्रमाणे सेवेमध्ये सामावून घ्यावे,
२) पूर्वीच्या विद्युत मंडळातील रोजंदारी कामगारांना जसे सामावून घेतले त्याच पद्धतीने रोजंदारी कामगार म्हणून विना अट सेवा जोडणे नुसार सामावून घ्यावे,
३) तिन्ही वीज कंपनीतील कामगारांना जोपर्यंत सामावून घेण्यात येत नाही, तोपर्यंत साठ वर्षे नोकरीची हमी द्यावी, ठोस कारणाशिवाय कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करता येऊ नये,
४) राज्य सरकारने निश्चित केलेल्या किमान वेतनामध्ये चाळीस टक्के वाढ करावी.
सदर मागण्या प्रशासनाने मान्य न केल्यास किंवा कुठल्याही प्रकारचा तोडगा न काढल्यास संपूर्ण महाराष्टतील तीनही कंपनीतील कंत्राटी कामगार दिनांक 5/3/2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला सदर द्वारसभेला श्री रंजन बॉलमवार, भोलेशंकर बोरकर, प्रशांत ढवगाये, अवी सावसगडे,राजन बांबोडकर, सुरेश रोहनकर, आतिफ खान, निकेश निकुरे, सौरभ टेम्भूणे, रुपेश गणवीर, इम्रान कुरेशी, हर्षा बांबूडे, अमोल फुलझेले आदींनी संबोधीत केले.
