VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद..
गडचिरोली/अहेरी २८ फेब्रुवारी २०२४::- अहेरी येथे असी. कमांडन्ट विलासजी गावडे यांचा विवाह प्रभू दुग्गा यांची मुलगी चि.सौ.का.भावना यांच्याशी गडचिरोली येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
त्या निमित्य अहेरी येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजीत केले होते,त्या स्वागत समारंभास भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.
यावेळी मेडपल्ली चे सरपंच निलेश वेलादी,गुरुपल्ली ग्रा.प.सदस्य अजय मडावी,सूरज दुग्गा,राजेश आत्राम,श्रीदास सोयाम,चंदू गावडे,सुरेश तलांडे,प्रवीण मडावी,साईनाथ आत्राम,विनोद कावेरी,जुलेख शेख,अहेरी शहराध्यक्ष मिलिंद अलोने उपस्थित होते.
