Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,०५ मार्च २०२४::- तालुक्यातील अप्पापल्ली येथील युवा गणेश मंडळ अप्पापल्ली द्वारे ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेची आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या उदघाटन करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री सतपूते – हणमंतू तुमडे – संतू सतपुते – देवाजी हजारे – ज्योती गावडे – सिद्धार्थ घोटे – मारुती ओंडरे – गौतम झाडे – मनोहर दुर्गे – संजू भोयर – पोशान्ना नागपुरे – तुळशीराम हुलके – राजन्ना छापले – बालाजी चांदे – दामाजी ठाकूर – विठ्ठल पूलगामकर – सुधाकर ठाकूर – अंकन्ना सामरे – मुतांना सतपुतेसह आलापल्ली येथील प्रतिष्ठीत नागरिक होते.

या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी काँग्रेस नेते तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीया पारितोषिक आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी – आलापल्ली येथील प्रतिष्ठीत नागरिक बाबुराव नागापुरे कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी कडून देण्यात येत आहे.

यावेळी उदघाटन प्रसंगी माजी सरपंच अशोक येलमुले,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य अश्विनी दुर्गे,सदस्य मडावी,मारुती ओडरे,गौतम झाडे,महादेव झाडे,गणपती सतपुते,सुधाकर ठाकूर,बालाजी चंदे,ज्योती गावडे,देवाजी,दिवाकर आलम, महेश नैताम,प्रशांत गोडसेलवार,कार्तिक तोगम,नरेश गर्गम,सचिन पंचार्य,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अनिल चांदे,उपाध्यक्ष अरुण हूलके,सचिव बिट्टू फलके,क्रीडा प्रमुख विलान नागापुरे,सहसचिव राहुल चांदेसह आदीनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular