VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
देवलमरी येथे शिवालाय समोर नव्याने बांधलेल्या शेडचे राजेंच्या हस्ते लोकार्पण.
गडचिरोली/अहेरी,०८ मार्च २०२४::- देवलमरी येथे हेमाडपंथी शैलीतल्या प्राचिन शिवालयासमोर नव्याने बांधलेल्या शेडचे लोकार्पण माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे हस्ते करण्यात आले.प्रसंगी बोलतांना पुरातन काळापासुनच मंदिर हे समाजाला एकासुत्रात बांधणारी संस्था असायची.सणावाराला व इतर मंगलप्रसंगी सर्वच समाज एकत्रित येवुन ऊत्सव साजरे व्हायचे त्यामुळे मंदीरे सामाजीक एकतेचे प्रतिक ठरायचे तर आजतागायत मंदीरांच्या छताखाली एक होण्याची पध्दत सुरुच आहे.
सर्व समाज एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहाणे हे समृध्दीकडे वाटचाल करणारे ठरते असे प्रतिपादन त्यांनी केले तसेच समाजाची एकता सर्वच कार्यात असायला पाहीजे असे मत व्यक्त केले.प्रसंगी इतर मान्यवरांचे समयोचित भाषणे झाली.देवलमरीचे सरपंच लक्ष्मण कन्नाके यांनी तेथील शिव भजन मंडळाच्या युवकांचे सुरु ऊत्कृष्ट कार्य विशद केले.यावेळी शिवभजन मंडळातर्फे राजे अम्ब्रिशराव महाराजांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रस्तावने पासुन तर आभार प्रदर्शनापर्यंत संपुर्ण सुत्र संचालन अस्खलितपणे व सुटसुटीतरित्या कावेरी डोके,रक्षीता तोकला,अंजना धंदेर या शाळकरी त्रिकुटांनी केल्याने सर्वच मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी शिवभजन मंडळाचे राहुल गुंडावार अध्यक्ष,कमलाकर गददेपाकवर सचिव,रमेश बामनकर उपाध्यक्ष,प्रविण बामनकर,प्रसाद कोप्पूलवार,महेश भोयर,किशोर तोकला,शैलेश तोकला,स्वामी तोकला,सुनील रामगिरी,संतोष इसनकर,सचिन बामनकर,प्रशांत बामनकर हे होते तर प्रतिष्ठित नागरिक म्हणून सतिशजी दोंतुलवार,प्रभाकरजी वरगंटीवार,सत्यमजी गौडेवार,भोनगु रामगीरी, पोशन्नाजी कोपुलवार,येल्लय्याजी तोकला,विनोदजी वरगंटीवार,मोहनराव आईलवार,अशोकजी नार्लावार,शंकरजी गुंडावार इ. व समस्त गावकरी ऊपस्थित होते.
