Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे लोकार्पण…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,१२ मार्च २०२४::- तालुक्यातील दामरंचा ग्रामपंचायत येथील वर्ग खोली नसल्याने बालकांना शिक्षण घेण्यासाठी अडचण भासत होते.हि बाब दामरंचा येथील सरपंच किरणताई कोडापे व नागरिक तसेच आविसं काँग्रेसचे कार्यकर्त्यांडून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना अहेरी जनसंपर्क कार्यालय येते भेट घेऊन अजयभाऊंना सांगण्यात आली आहे.    नागरिकांची मागणी लक्षात घेऊन.जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22अंतर्गत दामरंचा येते जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोली मंजूर करून दिले होते.सदर वर्ग खोलीची काम पूर्णत्वास झाल्याने लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आली आहे.येथील समस्त नागरिक अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम,दामरंचा ग्रामपंचायतचे सरपंच किरणताई कोडापे,ग्रामपंचायत सदस्य वनश्री सिडाम,ग्रामपंचायत सदस्य सुरज सिडाम,मांडराचे माजी सरपंचा तथा विद्यमान सदस्य कू. इंदूताई कन्नाके,माजी सरपंच जिलकरशहा मडावी,काँग्रेस कार्यकर्ते स्वप्नील मडावी, नरेंद्र गर्गम,सुरेश दुर्गे,दिवाकर आलाम,माजी उपसरपंच संजय पोरतेट,नामदेव पेंदाम,प्रमोद कोडापे,विनोद दूनलावार,कार्तिक अल्याडवार,भास्कर कोडापे,कुमराय्या सुरमवार,मनोज कोडापे,गुरुदास सडमेक,शैलेश कोंडागुर्ले,सचिन पांचाऱ्या,चिंटू पेंदामसह आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular