Sunday, June 14, 2026
HomeEtapalli48 तासात खुणाची उकल करण्यास एटापल्ली पोलिसांना यश...

48 तासात खुणाची उकल करण्यास एटापल्ली पोलिसांना यश…

VAINGANGA NEWS 24/ प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार,

गडचिरोली,२० मार्च २०२४::- दिनांक 17.03.2024 रोजी सकाळी 07.00 वाजता गोपनीय माहिती मिळाली की एकरा क्रॉसिंग ते जीवनगट्टा जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एका झाडाला अज्ञात इसमाचा मृतदेह लटकलेला आहे. सदर माहितीवरून पोनी/निळकंठ कुकडे, पोलीस उप निरीक्षक शुभम म्हेत्रे व पोलीस स्टेशन स्टाफसह घटनास्थळास भेट दिली असता एका अनोळखी इसमाचा मृतदेह एका झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आला सदर मृत इसमाबाबत चौकशी केली असता तो संपत लुला दुर्वा रा.पेठा येथील असल्याचे समजले त्यानंतर मुर्तकाची पत्नी तारा संपत दुर्वा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन एटापल्ली येथे अप क्रमांक 15/2024 कलम -302, 201, 34 अन्वये गुन्हा नोंद कऱण्यात आला. त्यानंतर मा.निलोतप्ल सो.पोलीस अधिक्षक , गडचिरोली मा. एम.रमेश अपर पोलीस अधीक्षक अहेरी ,मा. चैतन्य कदम सा. उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. निळकंठ कुकडे यांनी तपास कामी तीन पथक नेमून तपासास सुरुवात केली त्यानंतर एटापल्ली, पेठा, जीवनगट्टा, एकरा, इत्यादी गावात आरोपींचा शोध घेणे सुरू केला. त्यानंतर अधिक विचारपूस केल्यानंतर दिनांक 19.03.2024 रोजी सदर खूना मध्ये दोन व्यक्ती असुन त्यांचे मृतक संपत ध्रुवा याच्याकडे पैसे असल्याचे समजून आले. त्यानंतर तपास अधिक वेगाने करून आणखी एक इसम त्यामध्ये सहभागी असल्याचे समजले त्यानंतर चौकशी अंती आशिष कोरामी, सुखदेव मडावी व संजय कोरामी सर्व राहणार पेठा यांनीच संपत लूला दुर्वा चा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनी/निळकंठ कुकडे, पोलीस निरीक्षक, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी नागरगोजे, उपनिरीक्षक शुभम म्हेत्रे, महिला पोलीस उपनिरीक्षक, रोहिणी गिरवलकर पोलीस हवालदार हिरामण मारटकर, पोहवा /कालेश पुपरेडीवार, नापोशी प्रभाकर नाईक,पोलीस शिपाई /मोहन शिंदे, पोलीस शिपाई /पंडीत मुंडे, पोलीस शिपाई /श्रीकांत दुर्गे, महिला पोलीस शिपाई / कविता एलमुले NPC/प्रकाश गडकर, NPC/ जोगी मडावी, मपोशी/ प्रियंका तुलावी यांच्या पथकाने सदर खुनाच्या गुन्ह्याची 48 तासात उकल केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular