Friday, July 31, 2026
HomeAramoriनिवडणूक खर्च निरीक्षकांकडून यंत्रणेचा आढावा...

निवडणूक खर्च निरीक्षकांकडून यंत्रणेचा आढावा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

आरमोरी गडचिरोली चिमूर व ब्रम्हपूरी मतदार संघात केली पाहणी.

नागरिकांच्या तक्रारी घेणार जाणून. 

गडचिरोली/आरमोरी,२१ मार्च २०२४::- सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात आज निवडणुक खर्च निरिक्षक श्री. एस. वेणु गोपाल यांनी आरमोरी, गडचिरोली, चिमूर व ब्रम्हपूरी या विधानसभा मतदार संघात भेट दिली. त्यांनी निवडणुक विषयक कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली व संबंधीत सहायक निवडणूक अधिकारी यांचेकडून निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला.   गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात श्री एस. वेणु गोपाल यांचे स्वागत जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी राहूल मीना, ओमकार पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके उपस्थित होते. 

सर्वसामान्य मतदार, निवडणूक लढणारे उमेदवार, राजकीय पक्ष यांनी निवडणुक खर्चविषयक तक्रारी श्री एस. वेणुगोपाल यांच्या 9420067690 या संपर्क क्रमांकावर किंवा निवडणूक विभागाच्या सी-व्हीजील या मोबाईल ॲपवर नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular