Friday, May 22, 2026
HomeAheriएकता मंडळ तर्फे मुखबधिरांना शाळेचा साहित्य वाटप...

एकता मंडळ तर्फे मुखबधिरांना शाळेचा साहित्य वाटप…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती.

गडचिरोली/अहेरी,२१ मार्च २०२४::- अहेरी येथील स्थानिक श्री विठ्ठल रघुमाई मंदिर सभागृहात एकता मंडळ तर्फे शालेय साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात आले.     कर्यामाच्या अध्यक्ष स्थानी राजे अम्ब्रिशराव आत्राम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त विनोदराव भोसले आणि शाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षक मंच्यावर होते.या कार्यक्रमात मुखबधिर शाळेतील मुलां – मुलींना शालेय साहित्य बॅग,बुक, पुस्तके,पेन आदी उपयोगी शैक्षणिक साहित्य राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते देण्यात आले.राजेंनी सर्व मुखाबधिरांना डेअरी मिल्क चॉकलेट आणि आइस क्रीम खाऊ म्हणून दिले.     प्रमुख पाहुणे विनोदराव भोसले यांनी मंचावरून बोलतांना म्हणाले की,मुकबधिर समुदायासाठी ऐका मूकबधिर शाळा,आलापल्ली त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांना समान संधी प्रदान करण्यासाठी एक समाज म्हणून वचनबद्ध आहे. या मूकबधिर समुदायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना भावनिक आधार देण्यासाठी सर्वांनी मोठ्या कुटुंबासारखे आहोत अशी भावना ठेवावी जेणेकरून ते अधिक शिकू शकतील. त्यांचा आत्मसन्मान वाढवण्याचा प्रयत्न करणे जेणेकरुन त्यांना जीवनात स्वतःचे निर्णय घेता येतील.

  या उपक्रमाकरीता एकता मंडळ चे अध्यक्ष श्रीकांत ओडेट्टीवार, उपाध्यक्ष रोशन मुलकलवार, सचिव प्रणित श्रीरामवार, कोषाध्यक्ष अक्षय संतोषवार, सदस्य साहिल कोडापे, कृणाल संतोषवार,राजू तोटावार, दिपक कुमरे,तेजस संतोषवार,श्रीधर गुमलवार,शुभम गुमलवार,रोहित मुलकलवार आदी मंडळाचे सदस्यानी परिश्रम घेतला.

   मूकबधिर मुलांचे दोन प्रकार आहेत. जे पूर्णपणे बहिरे आहेत त्यांना पहिल्या श्रेणीत ठेवता येईल. त्यांच्याकडे ऐकण्याची क्षमता नाही, म्हणून शब्द ऐकू येत नसल्यामुळे, ते उच्चार करू शकत नाहीत कारण भाषा शिकणे अनुकरणावर अधिक अवलंबून असते. बधिरांचा दुसरा प्रकार म्हणजे ज्यांचे ऐकणे इतके कमकुवत आहे की ते सामान्य संभाषण ऐकू शकत नाहीत परंतु श्रवणयंत्राच्या मदतीने ते ऐकू शकतात.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular