Sunday, June 14, 2026
HomeSironchaसिरोंचा येथील स्टँप पेपर विकणाऱ्याकडून होणाऱ्या पैशांची लूट तात्काळ थांबवा : रा.कां.शरदचंद्र...

सिरोंचा येथील स्टँप पेपर विकणाऱ्याकडून होणाऱ्या पैशांची लूट तात्काळ थांबवा : रा.कां.शरदचंद्र पवार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून तहीलदारांना निवेदन…

गडचिरोली/सूरोंचा,२२ मार्च २०२४::- गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणुन सिरोंचा तालुक्याचे ओळख आहे, तालुका ठिकाणी तालुक्यातील दुर्गम भागातील, रेगुंठा, बामणी, टेकडा ताला, झिंगानुर, कोर्ला, कोपेला, पतागुडेम,सोमनपल्ली, आसरअल्ली,असे अनेक गावातील लोकांनी सिरोंचा तालुका मुख्यालयात विविध शासकीय कामासाठी येत असतात, तसेच लोकांना शासकीय व इतर कामासाठी स्टॅम्प पेपरची गरज असते,

    आणि एका १०० रुपयांची स्टॅम्प पेपरची शासनाची चालना १०० रुपये असताना मात्र संबधित स्टॅम्प पेपर विकणारे व्ही. आर.विश्वनाथुलवार यानी एका स्टॅम्प पेपरचा मागे २० ते ३० असे रुपये जास्त घेत आहे,

           शासनाकडून १०० रुपयांचे स्टॅम्प पेपरला २% टक्के कमिशन मिळत असताना देखिल लोकांकडून अधिक पैशाची लूट केली जात आहे,

          स्टॅम्प पेपर विकणारे व्ही. आर.विश्वनाथुलवार यांनी तहसिल कार्यालयात स्टॅम्प पेपर विकायची असताना देखिल त्यांनी स्वता त्यांच्या घरात बसून स्टॅम्प पेपर विकले जात आहे,

           तिथे १ ते २ तास रांगेत उन्हात रस्त्यावर उभे रहावा लागत आहे, स्टँप पेपर विकणारे व्ही. आर.विश्वनाथुलवार मुद्रांक विक्रेता परवाना क्र . १०६१-१०६४ यांचे परवाना रद्द करुन त्यांचेकडून होणाऱ्या सामान्य लोकांच्या पैशांची लूट तात्काळ थांबविण्यात यावी,आणि तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना स्टँप पेपर विकण्याचे परवानगी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष – अतूल भाऊ गण्यारापवार , सिरोंचा तालुकाध्क्ष – फाजील पाशा,यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी स्थानिक तहीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे,

        त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिणीस – चोक्कामवार, तालुका उपाध्यक्ष – सागर भाऊ मूलकला, सचिव – सडवली मेडीझेरला, कार्यकर्ते – गणेश सांड्रा, राजकुमार मुलकला आदी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular