Thursday, October 29, 2026
HomeAshtiलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आष्टी पोलिसांनी पकडली 3,96,000 रुपयाचा दारूसह मुद्देमाल जप्त...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आष्टी पोलिसांनी पकडली 3,96,000 रुपयाचा दारूसह मुद्देमाल जप्त…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वात धडक कारवाई. 

गडचिरोली,आष्टी,०२ एफ्रिल २०२४::- आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढुन कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्रगस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर कडे जाणाऱ्या मौजा मुधोली चक नं.०१ येथील मेन रोडवर एका पांढऱ्या रंगाची महिन्द्रा बोलेरो कंपनीची एम.एच ३४ ए.व्हि २१३६ हे वाहन संशयित रित्या फिरतांना दिसुन आल्याने त्यास थांबवुन त्याची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात ९० एम.एल मापाच्या ९६,०००/-रुपयाची देशी दारु व ०३ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण ३,९६,००० (तिन लाख छयानव हजार रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीतां विरुध्द पौस्टे आष्टी अप क्र.५२/२०२४ कलम ६५ (अ), ८३ मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मंडल करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक निलोत्पल,अप्पर पोलीस अधिक्षक (प्रशासन) चिंता,अप्पर पोलीस अधिक्षक (अहेरी) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी कोकाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक काळे,यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंडल, जगताप, पोलिस शिपाई राउत, मेंदाळे, येनगंटीवार,यांनी पार पाडली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular