Sunday, June 14, 2026
HomeBhamragad"आताची मोठी बातमी" तीन नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोली पोलिस दलांना मोठे यश...

“आताची मोठी बातमी” तीन नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोली पोलिस दलांना मोठे यश…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/ भामरागड,१३ मे २०२४::-तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परीसरात झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात सध्या सुरू असलेल्या TCOC कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती १३ मे रोजी सकाळी पोलिस विभागाला मिळाली.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या दोन तुकड्या तातडीने परीसरात शोधासाठी दाखल करण्यात आल्या. पथके परीसरात शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षल्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर १ पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्याचे मृतदेह आढळले आहेत. गोळीबाराच्या ठिकाणाहून तीन १ एके ४७, १ कार्बाइन आणि १ इन्सास रायफल, अशी तीन स्वयंचलित शस्त्रे तसेच नक्षल साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

यातील एका मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह पेरिमिली दलमचा प्रभारी आणि डीव्हीसीएम कमांडर वासू याचा असल्याचे पोलिस विभागाने म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular