Sunday, June 14, 2026
HomeSironchaअखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलनाला यश, सिरोंचा तहसिल कार्यालय समोरील रस्त्यांची...

अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलनाला यश, सिरोंचा तहसिल कार्यालय समोरील रस्त्यांची नवीन डांबरी सडक कामाला सुरूवात…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

    उपाध्यक्ष सागर भाऊ मूलकला यांच्या नेतृत्वातील भर पावसात दाहा दिवसांच्या आंदोलनाला यश…

गडचिरोली/सिरोंचा,२१ मे २०२४::- सिरोंचा नगर पंचायत हद्दीतील असलेल्या तहसिल कार्यालय समोरील रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर खड्डे पडून रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्वस्त होते,

    सिरोंचा ग्रामीण भागातून मुख्यालयातील तहसिल कार्यालयात अनेक कामांसाठी येणारी नागरिकांना तहसिल कार्यालय समोरील रस्त्यावर येण्या – जण्या करतांना खड्ड्यात मोठी त्रास सहन करावा लागत होता,

   सिरोंचा नगर पंचायत स्थापनानंतर या मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावी अशी स्थानिक नागरिकांनी अनेकदा मागणी देखील कऱण्यात आली होती,

   अशातच ही गंभीर समस्या घेऊन सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी फाजिल पाशा, सागर मूलकला, विनोद नायडू, चोक्कामवार, सलमान शेख, सलाम सय्यद, आनंद सोनारी, गणेश सांड्रा व कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालय समोर भर पावसात दाह दिवसांची आंदोलन करून लक्षवेधी केली आहे,

  त्यावेळी आंदोलनात सिरोंचा नगर पंचायतचे मुख्याधिकारी तथा तहसीलदार जितेंद्र शिकतोडे तसेच इंजिनियर घोडे यांनी आंदोलन स्थळी भेट देत तहसिल कार्यालय समोरील रस्त्यांची नवीन डांबरी सडक कामे लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिली आहे,

   आश्वासनानंतर अखेर सिरोंचा तहसील कार्यालय समोरील नवीन डांबरी सडक रस्त्यांची कामाला सुरूवात झाली आहे,

   तहसिल कार्यालय समोरील रस्त्यांची कामाला सुरूवात केल्याबद्दल तत्कालीन मुख्याधिकारी तसेच इंजिनियर घोडे, सिरोंचा नगर पंचायतचे नगर अध्यक्षा/उपाध्यक्ष व नगर सेवकांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सोशल मीडिया द्वारे आभार मानले आहे,

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular