Sunday, June 14, 2026
HomeUncategorizedलखमापूर बोरीवासीय मोकाट कुत्र्यांने त्रस्त...

लखमापूर बोरीवासीय मोकाट कुत्र्यांने त्रस्त…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

एका पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दंशमुळे इतर मोकाट कुत्रे पिसाळले.

गडचिरोली/लखमापूर बोरी ०७ जून २०२४::चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी इथे मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून मागील महिन्यापासुन कित्येक ग्रामस्थांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला असून कुत्र्यांची दहशत पसरली आहे व ग्रामस्थामध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले आहे.

   मागील महिन्यात बाहेर गावातून एक पिसाळलेली कुत्री गावात येऊन प्रत्येक गल्लीतील काही पाळीव प्राण्यांना, मोकाट कुत्र्यांना व ग्रामस्थांना चावा घेऊ लागली. पाळीव प्राण्यांना व ग्रामस्थांना चावा घेतल्यानंतर ते लगेच डॉक्टर कडे जाऊन उपचार घेतले मात्र मोकाट असलेल्या बिचाऱ्या कुत्र्यांना मात्र कुठलाच उपचार न मिळाल्यामुळे त्या कुत्र्यात रेबीज या रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. या रोगाच्या लक्षनात फ्युरीअस आणि पॅरालायटिक अशा दोन प्रकारांत आढळून येतात. आवाजातील बदल तसेच तोंडातून लाळ, फेस येणे आणि शेपटी मागील दोन्ही पायांच्या मध्ये असणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. फ्युरीअस प्रकार या प्रकारात बाधित प्राणी हे अस्वस्थ व रागीट होऊन इतर कुत्र्यांना व माणसांना खास करून लहान मुलांना चावतात परिणामी बाधित व्यक्तीला वेळेवर उपचार न मिळाल्या मुळे रेबीज रोग होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो.

  रस्त्यावरून चालत जाताना व मोटारसायकल ने जात असताना काही कुत्रे पाठलाग करत असतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.

लखमापूर बोरी मध्ये व आजूबाजूच्या गावामध्ये हे कुत्रे पसरून इतर मोकाट कुत्र्यांना दंशकरून बाधित करीत असतात, *या दहशततीमुळे ग्रामस्थानी सामान्य कुत्र्यांना सुद्धा मारणे सुरु केले त्यामुळे बिचाऱ्या निरपराध कुत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे* त्यामुळे ग्रामपंचायत ने यावर उपाय शोधून मोकाट कुत्र्यांना बंदिस्त करून लसीकरण व शक्यतो खच्चीकरण करावे. अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जातं आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular