VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन.
महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचा पुढाकार.
गडचिरोली, २१ जून २०२४::-राज्यातील शिंदे – -फडणविस -अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारने राज्यातील तरुणांचे करिअर घडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथील छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.
महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा शक्तीचे करिअर घडविण्यासाठी महायुती सरकारचा उपक्रम कौतुकास्पद आहे.यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचेसह मंत्री मंगल प्रभात लोढा यांचेही आभार मानले.
