Thursday, July 30, 2026
HomeGadchiroliदोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण...

दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,२८ जून २०२४::- शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षलवाद्यांसह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६६६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. २७ जून रोजी दोन जहाल महिला नक्षलवादी बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य / एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. १०, (वय २८) रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, व शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. १०, (वय २९) रा. कटेझरी ता. धानोरा यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. या दोघांवर मिळून १६ लाख रुपयांचे बक्षीस होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular