VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
नागपूर.०४ जुलै २०२४::- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री स्व.सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे दि.१ जुलै २०२४ ला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
या सबंधित माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते व माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी कोराडी नागपुर येथे त्यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देऊन आईच्या प्रतिमेला पुष्प वाहत भावपूर्ण श्रद्धांजलि वाहिली. त्यांच्या आत्म्यास शांती देवो व बावनकुळे परिवाराला दुःख सावरण्याचे बळ देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
या प्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री मान.रावसाहेब दानवे,माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचीही यावेळी भेट झाली.
