Friday, May 22, 2026
HomeAheriमाजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांचेकडून सुरेखा येरोजवार यांना आर्थिक मदत...

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांचेकडून सुरेखा येरोजवार यांना आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,१६ जुलै २०२४::-महागाव बूज. येथील सुरेखा येरोजवार ही महिला मागील पुष्कळ दिवसांपासून गाठीच्या कँन्सरने ग्रासलेली होती.गेल्या आठवड्यामध्ये या महिलेच्या गाठीच्या कँन्सरचा ऑपरेशन चंद्रपूर येथील रूग्णालयात करण्यात आले. सुरेखा येरोजवार यांची घरची परिस्थिती फार हलाखिची ( गरिब ) आहे.त्यांना औषधी वगैरे घेण्यासाठी पैशाची फारच चणचण होत आहे. हि बाब जेव्हा राजे अम्ब्रीशराव महाराज यांना कार्यकर्त्यां द्वारे कळाली तेव्हा त्यांनी सुरेखा येरोजवार यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत ( दहा हजार रू. ) महागाव बूज येथील उपसरपंच संजय अलोने यांच्या मार्फत पाठवले. व पुढे कोणतीही मदत लागल्यास आपण करू असेसुद्धा म्हटलेले आहे.यावेळी येरोजवार कुटुंबियांनी राजे साहेबांचे आभार मानले.

यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular