Wednesday, September 16, 2026
HomeChandrapurस्वतःच्या क्षमता ओळखून क्षेत्र निवडा,,PSI सुरज कोडापे यांचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवाहन...

स्वतःच्या क्षमता ओळखून क्षेत्र निवडा,,PSI सुरज कोडापे यांचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवाहन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

       चंद्रपूर,२८ जुलै २०२४::- स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना फक्त परीक्षेची तयारी होते असे नाही तर ह्या अभ्यासाच्या माध्यमातून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक समज आणि क्षमता विकसित होते.त्यामुळे क्षमतेच्या आणि आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी करिअरची संधी शोधली पाहिजे असे छात्रविर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय,मोरवा(चंद्रपूर)येथे मार्गदर्शन करताना सुरज कोडापे यांनी संबोधले.   

Oplus_0

    एमपीएससी परिक्षेमधून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेले सुरज कोडापे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे ह्यासाठी विशेषतः प्रा.डॉ.दिलीप चौधरी ह्यांनी प्रशासकीय सेवा महाविद्यालयात ह्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी केले होते.ह्यावेळी सुरज कोडापे यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल,श्रीफळ व भेट स्वरूपात डॉ.शरद बाविस्कर यांचे “भूरा” नावाचे ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.

        स्पर्धा परीक्षेची वाट गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना कठीण वाटत असली तरी योग्य मार्गदर्शनामुळे ही वाट सोपी होऊ शकते असे ह्यावेळेस डॉ. चौधरी यांनी अध्यक्षपदावरून सांगितले.

        पुढे कोडापे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षमता असते मात्र विद्यार्थ्यांनी आपला न्यूनगंड दूर करून आवश्यक त्या सुधारणा करत आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरे गेल्यास यश नक्की मिळते मार्गदर्शन केले.

       ह्यावेळी प्रशासकीय सेवा महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular