Sunday, September 13, 2026
HomeAheriआल्लापल्ली येथील श्रीहरी मंदिर बांधकामासाठी अजयभाऊ कंकडालवार व हनमंतू मडावी यांच्याकडून आर्थिक...

आल्लापल्ली येथील श्रीहरी मंदिर बांधकामासाठी अजयभाऊ कंकडालवार व हनमंतू मडावी यांच्याकडून आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,०६ ऑगस्ट २०२४::- तालुक्यातील आल्लापल्ली येथे नव्याने बांधकाम होऊ घातलेल्या श्रीहरी मंदिर बांधकामासाठी काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक व जि.प माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेस पक्षाचे आदिवासीं सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी या दोन्ही नेत्यांनी आपआपल्या परिने आर्थिक सहाय्य केली आहे.

आल्लापल्ली येथील श्रीहरी मंदिर मंडळाचे हरिदास परिमल हलदर यांनी काँग्रेसचे युवा नेते कंकडालवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मडावी या दोघांची अहेरी येथील कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन श्रीहरी मंदिर निर्माण कार्यास हातभार लावण्याची विनंती केले.श्रीहरी मंदिर मंडळाचे हरिदास हलदर यांच्या विनवणीला मान देऊन अजयभाऊ कंकडालवार आणि हनमंतू मडावी यांनी मंदिर निर्माण कार्यासाठी आर्थिक सहाय्य केले.

श्रीहरी मंदिर बांधकामासाठी हलदर यांना आर्थिक मदत करतांना कंकडालवार आणि मडावी यांचे सोबत जि.प.माजी सदस्य अजय नैताम,भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष वासनू मडावी स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,स्वप्नील मडावी आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular