Monday, September 14, 2026
HomeUncategorizedवनमजुरांच्या कष्टाचा थकीत मोबदला तात्काळ द्या अन्यथा टाळे ठोकणार -संतोष मद्दीवार...

वनमजुरांच्या कष्टाचा थकीत मोबदला तात्काळ द्या अन्यथा टाळे ठोकणार -संतोष मद्दीवार…

वनविभाग आलापल्ली येथील प्रकार.

गडचिरोली/आलापल्ली,१३ ऑगस्ट २०२४::- आलापल्ली परिक्षेत्रातील कंपार्टमेन्ट क्रमांक ४३ मध्ये वनमजुरांद्वारे विविध कामे करवुन घेतली.ऊन्हातान्हात केलेल्या कामांचा मोबदला सुमारे सहा महिने लोटूनही दिल्या गेला नाही.हातावरच पोट असलेल्या काबाडकष्ट करुन जगणार्‍या मजुरांची थट्टा वनविभागातर्फे सुरु आहे. कित्येक दिवसांपासुन संबंधीत वनरक्षकाकडून ना दर सांगण्यात येत आहे ना मोबदला कधी मिळणार याबद्दल सांगण्यात येत नसल्यामुळे मजुरी हडप करण्यात आल्याची शंका गरीब मजुरांना येत आहे.भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष मद्दीवार यांनी मागच्या महीण्यात विचारणा केली असता लवकरच रक्कम प्रदान करु असे सांगुन आश्वासीत केले होते परंतु भुगतान न झाल्याने पुन्हा कार्यालयास भेट देऊन विचारणा केली टोलवाटोलवीच्या ऊत्तरांमुळे तात्काळ मोबदला न दिल्यास पुढील सोमवारला भाजपा अहेरी तालुकातर्फे कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा दिला. यावेळी भाजप तालुका ऊपाध्यक्ष दिपक तोगरवार,महामंत्री अभिजीत शेण्डे,किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रमोद भोयर,राकेश कोसरे,श्रीनीवास भोयर,सतिश येल्लूर,कृष्णकांत जनकापुरे,संतोष येल्लूर,नागेश बोरकुटे,प्रकाश राऊत इत्यादी असंख्य कार्यकर्ते ऊपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular