
तिरंगा रॅलीने दुमदुमली चामोर्शी नगरी आमदार डॉ देवराव होळी यांच्या नेतृत्वात चामोर्शी येथे तिरंगा रॅलीचे आयोजन.
गडचिरोली/चामोर्शी,१४ ऑगस्ट २०२४::- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या “हर घर तिरंगा ” अभियान अंतर्गत आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात चामोर्शी शहरात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ह्या बाईक रॅलीने संपूर्ण चामोर्शी शहर तिरंगामय झाल्याचे दिसून आले.* *या रॅलीचा शुभारंभ आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथून करण्यात आला. त्यानंतर ही रॅली लक्ष्मी गेट, चवडेश्वरी मंदिर, पोलीस स्टेशन, वाळवंटी चौक, बाजर चौक, बस स्टॉप, फिरून आल्यानंतर जनसंपर्क कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला**यावेळी जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, तालुका उपाध्यक्ष जयराम चलाख, निखिल धोडरे, यश गण्यारपवार, माजी जि. पं. सदस्या शिल्पाताई रॉय, नगरसेविका गीताताई सोरते, महिला आघाडी तालुका अध्यक्ष अनिता रॉय, माधवी पेशंट्टीवार प्रतीक राठी, भोजराज भगत, कामगार आघाडी तालुका अध्यक्ष लोमेश सातपुते, उमेश पिटाले, गोलू बारसागडे, शंकर दास, रामचंद्र वरवाडे, यांच्यासह तिरंगाप्रेमी बांधव मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले.
