Saturday, May 23, 2026
HomeUncategorizedशालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या, चामोर्शीतील जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळेत धक्कादायक प्रकार...

शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या, चामोर्शीतील जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळेत धक्कादायक प्रकार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

गडचिरोली/चामोर्शी,१७ ऑगस्ट २०२४::-विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या जात आहेत.

चॉकलेट बार मध्ये अऴी

शालेय पोषण आहार हा याच योजनेतील एक भाग आहे. चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळा येथील विद्यार्थ्यांना मिलेट्स चॉकलेट वाटण्यात आले.

बाईक – नागेश्वर पात्रे पालकवर्ग चामोर्शी

घरी जाऊन चॉकलेटचे वेष्टन उघडताच अळ्या आढळल्या.त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावार आलेला दिसून येतो.

गडचिरोली जिल्हातील चामोर्शी जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मंगळवार वाटण्यात आलेल्या मिलेट्स चॉकलेट (बार)मध्ये अळ्या आढळल्या आहेत.

बाईट – उर्मिला पेद्दीवार,पालकवर्ग चामोर्शी,

या घटनेसाठी जबाबदार अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर पालकांनी कारवाईची मागणी केली आहे.विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि अभ्यासाची गोडी निर्माण व्हावीयासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. शालेय पोषण आहार हा याच योजनेतील एक महत्वपूर्ण भाग आहे.

शाळेतील विद्यार्थी

चाॅकलेटमध्ये अळ्या मुख्याध्यापकांकडे तक्रार, त्यांचे कंत्राटदाराकडे बोट.मुलांना पोषण आहार म्हणून वाटण्यात येणाऱ्या चॉकलेट (बार)मध्ये अळ्या आढळल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेच ते मिलेट्स चॉकलेट (बार)

मुख्याध्यापकांना याविषयीची माहिती विचारली असता त्यांनी गडचिरोलीचे कंत्राटदार मिलिंद उपल्लवार यांच्या कडून हे चॉकलेट वाटण्यात आल्याचे सांगितले.

इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सदर चॉकलेटचे वितरण करण्यात आले आहे.शालेय पोषण आहारात वितरण करण्यात येणारे मिलेट्स चॉकलेट (बार) हे निकृष्ट दर्जाचे असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेड होतोय.

एक्सपायर डेट ११/२०२४ तरी सुध्दा अऴी निघतात

तर हे पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? असा प्रश्न पालकवर्गातून होत आहे.

यावेळी उपस्थित पालक वर्ग श्रावण वाकोडे, नागेश्वर पात्रे, उर्मिला पेद्दीवार, प्रीती वाट, संतोष पडालवार, प्रशांत पुराम, सुरेश कटकमवार, सुधाकर नैताम, विनोद कागदेलवार, महेश खोबे, आशिष जोषी विशाल मटाती

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular