Saturday, May 23, 2026
HomeUncategorized१८ ऑगस्टला कोठरी येथे होणाऱ्या बौद्ध समाजाच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा...

१८ ऑगस्टला कोठरी येथे होणाऱ्या बौद्ध समाजाच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

बौद्ध समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराचे आवाहन.

बौद्ध समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या वतीने बौद्ध समाज मेळाव्याचे आयोजन.

भन्ते भगीरथ यांची भेट व कार्यक्रम संदर्भात चर्चा,बौद्ध विहाराकडे जाणाऱ्या रस्ता विकास कामाचे 1.20 कोटी रु. भूमिपूजन

गडचिरोली/चामोर्शी,१६ ऑगस्ट २०२४::- बौद्ध समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक १८ ऑगस्ट रोज रविवारला सकाळी ११ वाजता “बौद्ध समाज मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे .या बौद्ध समाज मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बौद्ध समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने केले आहे.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कोठरी परिसरात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे. यानिमित्ताने या कामांचे भूमिपूजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला अधिकाधिक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या माध्यमातून केले आहे.

यावेळी प्रामुख्याने उपसरपंच छत्रपती दुर्गे, दिलीप चलाख, जैराम चलाख, सुरेश शहा, यश गण्यारपवार,अक्षय नरोटे, अशोक पुडो, संजय पुडो, उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular