Saturday, May 23, 2026
HomeUncategorized"लाडकी बहिणींचा" भव्य मेळावा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साधणार संवाद...

“लाडकी बहिणींचा” भव्य मेळावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साधणार संवाद…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

गडचिरोली,१७ ऑगस्ट २०२४::- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी बहिणींचा उद्या दिनांक 18 ऑगस्ट 2024, ठीक3:00 वा गडचिरोली येथील अभिनव लॉन या ठिकाणी भव्य मेळावा होणार व त्या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाला गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यातील सर्व महिला भगिनी सर्व महिला सरपंच लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ज्यांना लाभ मिळाला नाही अशांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे जे लाभार्थी वंचित राहिले त्यांचे फॉर्म भरून दिल्या जाणार तसेच ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचाही पाठपुरावा घेणार आहेत थेट संवाद साधताना अनेक लाभार्थी लाडकी बहीण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधणार.

अशी माहिती भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, तसेच भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर मिलिंद नरोटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, प्रदेश महिला आघाडी सदस्य रेखाताई डोळस, युवामोर्चा युवती प्रमुख पायल कोडापे यांनी प्रेस च्या माध्यमातून दिली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular