Saturday, September 19, 2026
HomeAheriकाँग्रेसनेते अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जि.अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी घेतली...

काँग्रेसनेते अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जि.अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी घेतली शिव मंदिरात दर्शन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

Gadchiroli/अहेरी, २४ ऑगस्ट २०२४::- तालुक्यातील देवलमरी शिव मंदिर येथील दरवर्षी दोन दिवस भजन कार्यक्रम आयोजित केली जाते.या वर्षी सुद्धा दोन दिवशी भजन कार्यक्रम मोठ् मोठ्या थाटात संपन्न झालं आहे.तसेच मंदिरात या दोन दिवस भाविकांना महाप्रसादाची कार्यक्रम आयोजित केली होती.काल कार्यक्रमाचा शेटचा दिवस असून काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी साहेबांनी शिव मंदिरात भजन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून भगवान शिवशंकराची विधिवात पूजा अर्चना करून दर्शन घेतले.तसेच कंकडालवार यांनी महाप्रसाद कार्यक्रमाला आर्थिक मदत केली.त्यावेळी अजय कंकडालवार यांनी भगवान शिवशंकरच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना करून स्थानिक समस्या जाणून घेतले.यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,देवलमरी काँग्रेसचे पदाधिकारी महेश लेकूर,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्यसह स्थानिक कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular