
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/एटापल्ली,२७ ऑगस्ट २०२४::- तालुका स्तरावर सुरू असलेल्या दुर्गम भागातील शिक्षणाकरिता सोयी नसणाऱ्या विद्यार्थ्यांन करिता एटापल्ली येथील स्वामी विवेकानंद छात्रावास येथे समर्पण ट्रस्टच्या सदस्यांनी आकस्मिक भेट देऊन विचारपूस केली असता विद्यार्थ्यांनी सिलिंग फॅन व इतर साहित्याची कमतरता आहे असे सांगितले. समाज कार्यात तत्पर असलेल्या समर्पण ट्रस्ट एटापल्लीने विद्यार्थ्यांचे समस्या जाणले व संस्थेने सदर स्वामी विवेकानंद छात्रावास मध्ये जाऊन त्या ठिकाणी सीलिंग फॅन व शैक्षणिक साहित्य भेट देऊन विद्यार्थ्यांचा समाधान केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटून आले.त्यामुळे संस्थेने विद्यार्थ्यांचे हास्य हेच आमचे पुरस्कार असा बोध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केला आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, उपाध्यक्ष राहुल कुळमेथे, सचिव अमोल गजाडीवार, सहसचिव रोहित बोमकंटीवार, कोषाध्यक्ष सुरज मंडल, संपत पैडाकुलवार सदस्य, अंकित दिकोंडवार सदस्य, संतोष गंधेशिरवार सदस्य तसेच वस्तीगृहाचे व्यवस्थापक व्यंकटस्वामी गोपाला हे उपस्तीत होते.
