
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गोल्ला उर्फ गोलकर समाजाकडून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार.
गडचिरोली/अहेरी, २७ ऑगस्ट २०२४::- आलापल्ली येथे गोल्ला उर्फ गोलकर समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असून आलापल्ली येथील भगवान श्री कृष्ण मंदिर येथे श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दोन दिवशीय कार्यक्रम आयोजीत करून भजन कीर्तन,जागरण व गोपाळकाल्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
गोल्ला उर्फ गोलकर समाजाच्या विनंतीला मान देऊन गोपालकाळ्याच्या कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम उपस्थित राहून समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या वेळी समाज बांधवांनी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या दोन दिवसीय कार्यक्रमाला गोल्ला उर्फ गोलकर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
