
VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/अहेरी,१० सप्टेंबर २०२४::- कमलापुर येथील राजु व्येंकटस्वामी येन्नमवार या गरीब तरुणाला वडिलांची छत्रछाया हरविल्यानंतर आई मोलमजूरी करुन ऊदरनिर्वाह करत होती.राजू सुध्दा मिळेल ते काम करुन घर चालवायला लागला होता. त्याने ड्रायव्हींग सुध्दा शिकून घेतले होते.होतकरु आणि प्रामाणिक राजुचे मित्रमंडळी सुध्दा त्याला मदत करण्याचे प्रयत्न करत परंतू स्वाभिमानी राजुला आत्मनिर्भर व्हायचे होते,

आँटोरिक्षा चालवुन गुजराण करावी असा विचार त्याचा होता परंतू आँटोरिक्षा घेण्यासाठी भांडवल त्याच्याकडे नव्हते.मित्रांसह अहेरी राजमहालात येऊन माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव महाराज यांची त्याने भेट घेऊन आपली व्यथा सांगीतली.लगेचच एक गरीब बेरोजगार युवक स्वावलंबी व्हावे हे विचार करून.. प्रामाणिकतेला नेहमी प्रामाणिकपणे साथ देणार्या राजे साहेबांनी आँटोरिक्षा घेण्यासाठी राजु व्येंकटस्वामी येन्नमवारला 50,000/- ( पन्नास हजार रुपये ) देऊन मदत केल्याने राजुचे स्वप्न पुर्ण झाले, खरोखरच राजे साहेबांचा दानशूरतेला तोड नाही.. राजु आणि त्याच्या सर्व मित्रमंडळींनी राजेसाहेबांचे आभार मानले.
