
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
Gadchiroli/अहेरी, १४ सप्टेंबर २०२४::- काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या कडून विविध गणेश मंडळ ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.या दरम्यान मंडळाकडून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे कार्यक्रम सुध्दा आयोजित करण्यात येत असतात.अहेरी विधानसभा क्षेत्रातील मुलचेरा तालुक्यातील 5 स्टार सार्वजनिक गणेश मंडळ सूंदरनगर व बालगणेश सार्वजनिक कमिटी खूदिरामपल्लीसह परिसरातील अनेक ठिकाणी काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या कडून महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजित केले जात आहे.अनेक गणेश मंडळांजवळ कंकडालवार व मडावी या दोघांकडून महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजन करीत असल्याने मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी कंकडालवार आणि मडावी यांचे आभार मानत आहे.विविध ठिकाणी गणेश मंडळाकडून आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाला परिसरातील समस्त जनतेनी व भाविकानी उपस्थित राहून महाप्रसादाचे आस्वाद घेण्याची आव्हान माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार आणि हंनमंतू मडावी यांनी केली आहे.
