Wednesday, July 29, 2026
HomeSironchaमाजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या तर्फे सिरोंच्या येथील जिल्हा स्तरीय कबड्डी...

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या तर्फे सिरोंच्या येथील जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना स्पोर्ट किट वाटप…

Gadchiroli/सिरोंच्या, १४ सप्टेंबर २०२४::- राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय सिरोंचा येथील जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट घेण्यासाठी आर्थिक अडचण होती.स्पर्धकांनी ही अडचण स्थानिक राजेचे खंदे समर्थक शाहरुख पठाण यांना सांगितली.शाहरूख पठाण यांनी ही बाब फोन वरून माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना दिली. त्यावेळी राजे साहेबांनी जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या 14 स्पर्धकांना स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून स्पोर्ट किट पाठवून त्यांना मदत केली.सर्व स्पर्धकांना पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व आपण पुन्हा सर्वतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन सुध्दा दिले.यावेळी राजे समर्थक शाहरुख पठाण,राम सीरंगी, नागराज गौरारपू,रजनीकांत बेले, राजू बद्दी, रवितेजा चिलमुला तसेच महाविद्यालयातील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने विद्यार्थीगण उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular