Sunday, June 14, 2026
HomeAheriविविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश,,पक्षाचा दुपट्टा टाकत मंत्री आत्राम यांनी केले...

विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश,,पक्षाचा दुपट्टा टाकत मंत्री आत्राम यांनी केले स्वागत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

Gadchiroli/अहेरी,१४ सप्टेंबर २०२४::- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) जाहीर प्रवेश घेतला.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत सर्वांचे स्वागत केले.राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली सध्या अहेरी विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी मोठमोठे सभा संपन्न होत आहेत. त्यांनी केलेले काम, विकासात्मक कामासाठी खेचुन आणलेली निधी,तरुणांना लाजवेल असा उत्साह व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा राकॉ पक्षात मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू आहे.शनिवारी (१४) सप्टेंबर रोजी मुलचेरा तालुक्यातील लगाम,येल्ला आणि शांतिग्राम येथील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.यात राजू सोनटक्के,सुधाकर मडावी,पतृ बावणे,वसंत मोहूर्ले, अशोक जनगमवार,संजीव मोहूर्ले, प्रकाश मोहूर्ले,बाबुराव कोल्हापुरे, भास्कर नैताम,दिवाकर बैलवार, मारोती सिडाम,दीपक मोहूर्ले,अशोक मोहूर्ले,केतन मडावी,छोटू मडावी,खुशब मडावी,विजय कोडापे,येल्ला येथील गजू रामटेके, सत्यवान रामटेके,प्रफुल दुर्गे,संतोष टेकुलवार,साईनाथ आलाम,छत्रपती रामटेके,साईनाथ अलोने,गुलाब उराडे,नामदेव रामटेके,प्रवीण रामटेके,शांतिग्राम येथील विनोद हलदार यांचा समावेश होता.राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकत पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले आणि पक्ष मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते अमित मुजुमदार,सपन डे, गोविंद बिश्वास,विकास मंडल आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular