Thursday, October 29, 2026
HomeAlapalliसंघटनात्मक बांधणीतून समाजाचा सर्वांगीण विकास - राजे अम्ब्रिशराव महाराज...

संघटनात्मक बांधणीतून समाजाचा सर्वांगीण विकास – राजे अम्ब्रिशराव महाराज…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

आलापल्ली येथे मार्कडेश्वर मंदिर सभागृहात पद्मशाली समाजाची सभा संपन्न…

Gadchiroli/आलापल्ली,१९ सप्टेंबर २०२४::- अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरातील मार्कडेश्वर मंदीर येथे पद्मशाली समाजाची सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेचे अध्यक्ष म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज होते.त्यावेळी राजे साहेबांनी मार्कडेश्वर मंदिरातील शिवलिंगाची विधिवत पूजन करून आशीर्वाद घेतला.

आलापल्ली येथील सर्व पद्मशाली समाजातील बांधवांनी राजे साहेबांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.पद्मशाली समाजाच्या सभेत मार्गदर्शन करतांना ते म्हणाले,पद्मशाली समाजातील सर्व समस्या दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर आहो,येणाऱ्या काळात पद्मशाली समाजातील अनेक विषय आहेत ते पूर्ण करणार असा मी शब्द देतो आणि पद्मशाली समाजाला कधीचं अडचण होऊ देणार नाही.

तुमच्या समाजातील समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देतो.समाज संघटित झाला पाहिजे आणि संघटनात्मक बांधणीतून समाजाचा सर्वांगीण विकास होतो असे मत यावेळी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी व्यक्त केले.

माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम,

यावेळी सभेत पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्री.सुरेश पसपुंनूवार,उपाध्यक्ष मधुकर कोंगावार,सचिव जीतेन्द्र ओडपल्लिवार,समय्या जलारापवार,व्यंकटेश इगावार,जगदिश जरापवार,निंतीन ओडपल्लिवार,दशरथ अडगोपुलवार,नरेश बोमावार,सुनील येन्नामवार,सौ.राणी अडगोपुलवार,सौ.कलावती पसपुंनूवार आणि मोठ्या संख्येने पद्मशाली समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular