
VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली ,२४ सप्टेंबर २०२४::- भारतीय रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या ९९ व्या जयंती निमित्त बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ दुपारी १२ वाजता रोजी केमिस्ट भवन, चामोर्शी रोड गडचिरोली येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याला पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष मा. रोहिदास राऊत, मा. अशोक निमगडे, राज्य उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, केशवराव सामृतवर, महिला आघाडीच्या सुरेखाताई बारसागडे, उपस्थित राहणार आहेत. जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.या मेळाव्यात जिल्यातील नागरिकांच्या समस्या व पक्ष संगठन बाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या ९९ व्या जयंती निमित्त बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८-०० वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे अभिवादन कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.तरी सर्व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास व अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निताताई सहारे, जिल्हासचीव ज्योती उंदिरवाडे, शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, महिला आघाडी शहर अध्यक्षा वनमाला झाडे आदींनी केले आहे.
