
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
Gadchiroli /एटापल्ली,२५ सप्टेंबर २०२४::- एटापल्ली न. प. हद्दीतील कृष्णार वॉर्ड क्र. 15 येथील रहिवाही असलेले श्री. मनोहर मंगरू हिचामी हे मागील अनेक दिवसांपासून आजाराने ग्रस्त होते.त्यातच त्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. सदर बाबा ताईंना कळताच ताईनी कृष्णार येथे जाऊन हिचामी परिवाराची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व परिवाराशी संवाद साधला.या पच्छात पत्नी सोनीताई हिचामी व बराच आप्त परिवार पाठीमागे आहे.यावेळी माजी जि. प. अध्यक्षा सौं.भाग्यश्रीताई आत्राम,गटनेते जितेंद्रजी टिकले, सामाजिक कार्यकर्ते ऋषिदादा पोरतेट,दीपकजी भांडेकर,येमलीच्या सरपंच मॅडम ललिताताई मडावी, माजी नगरसेवक सगुनाताई हिचामी उपस्थित होते.
