Friday, September 11, 2026
HomeChamorshiदेवाभाऊंच्या लाडक्या बहिणींचा मेळावा कुरुड व कुनघाडा येथे २५ सप्टेंबरला - आ....

देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींचा मेळावा कुरुड व कुनघाडा येथे २५ सप्टेंबरला – आ. डॉ. देवराव जी होळी यांनी लाडक्या बहिणींना उपस्थित राहण्याचे केले आवाहन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

कुरुळ येथे सकाळी ११ वाजता तर कुनघाडा येथे दुपारी २ वाजता होणार मेळावा**महिला प्रभाग संघाच्या सभागृहांचे भूमिपूजनही होणार.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, यांची नोंदणी केली जाणार.

Gadchiroli/ चामोर्शी २४ सप्टेंबर २०२४::- राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस (देवा भाऊ) यांच्या लाडक्या बहिणींचा मेळावा चामोर्शी तालुक्यातील कुरुड वूनगाडा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत नियोजित करण्यात आला असून दिनांक २५ सप्टेंबर रोजी कुरुड येथे सकाळी ११ वाजता तर कुनघाडा येथे दुपारी २ वाजता होणार आहे तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या माध्यमातून केले आहे.

हा मेळावा कुरुड येथे ग्रामपंचायत पटांगण परिसर तर कुणघाडा येथे वर्धमान राईस मिल येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, यांची नवीन नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी निधी उपलब्ध करून दिलेल्या महिला प्रभाग संघाच्या सभागृहांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्याला लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular